प्रत्येकाने राजकारणात कसा भाग घ्यावा?
अतिशय गरजेची मूल्यं आपण आपल्या घरी शिकतो. त्याप्रमाणे नागरीक म्हणून आपली कर्तव्यंही आपण शिकली पाहिजेत असं मला वाटतं. चालू घडामोडींबद्दल मुलांच्या मनात संकुचितपणा, असहिष्णुता, तिटकारा निर्माण करणं सोपं आहे, तितकंच त्यांना माहिती देणं, कुतूहल निर्माण करणं आणि जबाबदार नागरीक म्हणून तयार करणं सोपं आहे. कोणत्याही माणसाचा त्याच्या अंतरंगातच पराभव झालेला असल्याखेरीज बाहेर पराभव होत नाही.......